Share

यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीयांपेक्षा मागे, इमाम-उल-हकने सांगितले ‘हे’ कारण

Published On: 

मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील राजकीय संबधामुळे गेल्या अनेक वर्षापासुन दोन्ही देशात एकही क्रिकेट मालिका झालेली नाही. मात्र तरीही या दोन्ही देशातील क्रिकेटपटु या ना त्या कारणाने एकमेकाबद्दल वक्यक्य करत असतात. यात काही दिवसापुर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने आयसीसी क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले.

तरीही भारतीय क्रिकेटपटु हे नेहमीच पाकिस्तानी क्रिकेटपटुपेक्षा पुढे असल्याचे म्हणले जाते. या परिस्थीतीचे कारण पाकिस्तानचा क्रिकेटपटु इमान उल हकने स्पष्ट केले आहे. यावेळी बोलताना इमान उल हक म्हणाले की,’भारतीय खेळाडुंना आयपीएल स्पर्धेमुळे जागतीक स्तरावरील गोलंदाजाचा सामना करण्याची संधी मिळते. त्यामुळे ते खेळाडु मानसीकदृष्ट्या तयार होतात. याचा परिणाम त्यांना आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना कोणताही दबाव जाणवत नाही.’ असे सांगितले.

तसेच इमान उल हकने आयपीएलमध्ये मिळणारा पैसाही एक मोठे कारण असल्याचे नमुद केले आहे. कारण जर खेळाडुंना चांगले पैसे मिळत असतील तर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो आणि याचा परिणाम त्याच्या कामगीरीवर दिसतो. यावेळी त्याने पाकिस्तानी खेळाडुंना भारतीय खेळाडुइतके मानधन मिळत नसल्याने ते दुर्दैवी असल्याचे वक्तव्य देखील केले आहे. आमचे खेळाडु संघाबाहेर जाण्याच्या भितीने खेळत असल्यामुळे भारतीय खेळाडुपेक्षा मागे असल्याचे प्रतिपादन इमान उल हक यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!