🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले होते. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. यानंतर विदेशी खेळाडु मायदेशी परतले आहेत.
यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फंलदाज डेव्हिड वॉर्नर आणि अष्टपैलु खेळाडु मार्कस स्टॉयनीस हे दोघे इंग्लंडमध्ये आयोजीत ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत भाग घेणार होते. मात्र आता त्यांनी या स्पर्धेतुन माघार घेतली आहे. इंग्लंडमधील कोरोनाच्या सक्त नियमामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आसल्याची माहिती समोर आली आहे. आगामी काळात वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश दौऱ्यावर जाण्याआधी त्यांना कुटुंबीयासोबत वेळ घालवायचा असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आगामी स्पर्धेसाठी बायो बबलमध्ये जाण्याआधी दोघांनी परिवारासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉयनीस यांना साउथन ‘द हंड्रेड’ स्पर्धेतील ब्रेव संघाने खरेदी केले होते. वॉर्नरला त्यांनी 1 लाख युरो तर स्टॉयनीसला 80 हजार युरोमध्ये खरेदी केले होते. पुढील महिन्यात 21 जुलै रोजी सुरु होणारी ही स्पर्धा 21 ऑगस्टपर्यंत चालेल. या स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडु हरमनप्रित कौर, स्म्रीती मंधना, शेफाली वर्मा, दिप्ती शर्मा आणि जेमिमा रोड्रिग्स सहभागी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दक्षिण अफ्रिका-वेस्ट इंडिज कसोटी; दुसऱ्या डावात इंडिज 4 बाद 82, तीन दिवसाचा खेळ शिल्लक
- अश्विनला सार्वकालिन महान क्रिकेटपटू मानण्यास नकार देणाऱ्या मांजरेकरांचे ‘या’ खेळाडूने केले समर्थन म्हणाले…
- खरीप हंगामात बियाणे-खंताचा योग्य दरात पुरवठा करा, कृषी सचिवांचे निर्देश
- “शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका”, आ. लोणीकर आक्रमक
- ‘आजचा दिवस पाहायला वडिल हवे होते’, क्रिकेटपटू सकारिया गहिवरला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
