Share

‘द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये उभी केली युवा खेळाडूंची भक्कम वॉल’; डेव्हिड वॉर्नरने केली स्तुती

Published On: 

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुंचा दुसरा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन करणार आहे.

या दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक पद माजी क्रिकेटपटु राहुल द्रविड सांभाळणार आहे. एकाच वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे दोन संघ खेळत असल्याने सर्व स्तरातुन भारतीय क्रिकेटचे कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरने या गोष्टीचे श्रेय हे माजी क्रिकेटपटु राहुल द्रविडला दिले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, ’भारतीय संघातील जे युवा प्रतिभावान खेळाडु तयार झाले आहेत ते सर्व राहुल द्रविडच्या मार्गदर्शनामुळे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2018चा 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता. या संघातील अनेक खेळाडु भारतीय संघात खेळत आहे.’

यावेळी बोलताना वॉर्नरने यावर्षी भारताने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतीहासिक विजयाचा दाखला दिला. या दौऱ्यात अनेक अनुभवी खेळाडु जखमी होते तर काही संघात नसताना युवा खेळाडुंनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमित नमवले. तर आयपीएल 2013 मध्ये राहुल द्र्विडच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान रॉयलने प्ले ऑफ फेरीत धडक मारली होती. आता आगामी श्रीलंका दौऱ्यातील अनेक खेळाडू हे द्रविडच्या तालमीत तयार झालेले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!