मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुंचा दुसरा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन करणार आहे.
या दौऱ्यातुन भारतीय संघाचा अष्टपैलु खेळाडु हार्दिक पांड्या पुनरागमन करणार आहे. मात्र पाठीच्या दुखापतीमुळे तो अजुनही गोलंदाजी करण्यास फिट नसल्याचे त्याने सांगितले. मात्र आगामी टी-20 विश्वचषकात मला फलंदाजीसोबत गोलंदाजीतही योगदान द्यायचे आहे आणि मी नक्की तोपर्यंत पुर्णपणे फिट होईन असे हार्दिकने सांगितले. यावेळी बोलताना तो म्हणाला की, ‘आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत मी केवळ एक फलंदाज म्हणून नव्हे तर गोलंदाज म्हणून खेळण्यासाठी आतुर आहे. यासाठी मी स्वत:ला तयार करत आहे. या स्पर्धेत मला फलंदाजीसोबत गोलंदाजीतही योगदान द्यायचे आहे’ असे हार्दिकने यावेळी सांगितले.
श्रीलंका दौऱ्यात हार्दिक पांड्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही काळापासुन हार्दिक संघात केवळ एक फलंदाज म्हणून आहे. काही महिन्यापुर्वी पाठीच्या दुखण्यामुळे त्याला गोलंदाजी करता येत नव्हती. यादरम्यान त्याच्या पाठीच्या शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतरही हार्दिकला गोलंदाजी करण्यात अडचण येत होती. मात्र आता तो गोलंदाजी करण्यास सज्ज असल्याचे त्याने स्वत: माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ड्रायव्हिंग स्कूलसाठी जे नवे नियम जारी करण्यात आले आहेत ते नेमके आहेत तरी काय ?
- परळी औष्णिक विद्युत केंद्राने उभारला ऑक्सिजन प्लांट, पाहणी करतांना ऊर्जामंत्री म्हणाले दर्जेदार सेवा द्या!ॉ
- ‘मराठा समाजाचे प्रश्न ५ जुलै पर्यंत सोडवा अन्यथा…’ ; विनायक मेटेंचा इशारा
- ‘कितीही रणनिती आखू द्या, २०२४ ला मोदीच येणार!’, फडणवीसांचा दावा
- ‘भाजपसोबत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

