उस्मानाबाद: घरासमोर वाहने पार्किंग होत असल्याच्या कारणावरुण बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित लोंढे यांना शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या पुतण्याने मारहाण केल्याची घटना शनिवार दुपारी घडली. हल्लेखोरविरुद्ध कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत शहरातील खासगी हॉस्पिटल न उघडण्याचा पवित्रा शहरातील डॉक्टर संघटनेकडून घेण्यात आल्याने दुपारपासून खासगी आरोग्य सेवेची यंत्रणा कोलमडलेली होती. याप्रकरणी कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान डॉक्टर लोंढे याना झालेल्या मारहाणीचा डॉक्टर, व्यापारी संघटनेकडून निषेध करण्यात येत आहे.
कळंब येथील उपजिल्हा रुग्णलयात सुरू असलेले कोविड लसीकरण केंद्र मागच्या काही दिवसांपूर्वी विजया नर्सिंग होम येथे स्थलांतरित करण्यात आले. या हॉस्पिटलकडून विनामोबदला कोविड लसीकरणसाठी सहकार्य करण्यात येत आहे. डॉ. लोंढे याच्या घरासमोर शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांचे निवास्थान असून लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने यांच्या घरासमोर पार्कींग होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घरासमोर होत असलेल्या वाहन पार्किंगमुळे वादविवाद सुरू असल्याची माहिती आहे स्थानिकांकडून मिळाली.
दरम्यान शनिवारी कल्पना नरहिरे यांचा पुतण्या बालाजी नरहिरे याने आमच्या घरासमोर वाहने का उभी करतात म्हणून विजया नर्सिंग होम या रुग्णलयाच्या बाहेर येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.रुग्णलयाच्या बाहेर काय गोंधळ सुरू आहे हे पाहण्यासाठी डॉ अभिजित लोंढे घराबाहेर येऊन आम्हाला का शिवीगाळ करत आहात असा प्रश्न उपस्थित करताच बालाजी नरहिरे यांनी डॉ लोंढे यांची कॉलर पकडून मारहाण करण्यात आली.अशी माहिती स्वतः अभिजित लोंढे यांनी दिली.याप्रकरणी कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात आज १४९१० रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- ‘मी लठ्ठ असले तरीही…’, आपल्या लठ्ठपणावर बोलली विद्या बालन
- श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी खेळाडूंना राहावं लागणार ‘इतके’ दिवस ‘क्वारंटाइन’
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

