पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे पुणे शहराध्यक्ष निलेश माझीरे हे मनसे सोडून शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. त्यांनतर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मी मनसेतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर आता याबाबद निलेश माझीरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेत पक्षाला सोडण्याचे कारण जाहीर केले आहे.
निलेश माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पक्ष का सोडत आहोत? याचं कारण त्यांनी स्पष्ट जाहीर केले आहे. निलेश माझीरे म्हणाले, “मी आज पक्ष सोडण्याचं मुख्य कारण म्हणजे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर तसेच कोअर कमिटीतील इतर सदस्य आहेत”.
“19 मे रोजी मी मनसे सोडणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांत आल्या होत्या, त्यानंतर माझिरे यांची हकालपट्टी करा असं साईनाथ बाबर म्हणाले होते. तर बाबू वागस्कर यांनी तू पक्षात राहणार आहेस का? अशी विचारणा केली होती. मला बोलावून घेऊन विचारता तुम्ही पक्षात राहणार आहात का?” असं म्हणत हुकूमशाहीच सुरु आहे, असा आरोप करत निलेश माझीरे यांनी पक्ष सोडला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

