मुंबई : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज आणि आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये गुजरात टायटन्सचा खेळाडू वृद्धिमान साहा याने बंगालकडून रणजी बाद फेरीचे सामने खेळण्यास नकार दिला आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या साहाने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालची विनंती फेटाळली आहे. यामध्ये त्याला बंगालसाठी रणजी बाद फेरीचे सामने खेळण्याची विनंती करण्यात आली होती.
एका अहवालानुसार, CABचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी सांगितले, ”बंगालच्या क्रिकेट असोसिएशनची इच्छा होती की या निर्णायक प्रसंगी वृद्धिमान साहाने बंगालसाठी खेळावे, विशेषत: जेव्हा बंगाल संघाने रणजी करंडक जिंकल्यानंतर देशाचा अव्वल क्रमांकाचा संघ बनला होता. मी हे वृद्धिमानला कळवले होते आणि त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. मात्र, वृद्धीमानने आता आम्हाला कळवले आहे, की तो रणजी नॉकआऊट्स खेळण्यास तयार नाही.”
Wriddhiman Saha will not turn up for Bengal in the Ranji Trophy knockouts on account of unresolved issues with the state association
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 27, 2022
बंगाल क्रिकेट असोसिएशनने सुरुवातीला त्याचा (साहा) भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह संघात समावेश केला होता. यानंतर बंगाल क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आणि साहाने राज्याकडून एनओसी मागितल्याच्या बातम्या समोर आल्या. दालमिया यांनी खेळाडू आणि राज्य संघटना यांच्यातील संभाषण उघड करण्यास नकार दिला, असे म्हटले की खेळाडू आणि संघटना यांच्यातील कोणतीही चर्चा त्या खेळाडू आणि संघटना यांच्यातच असते. मी या टप्प्यावर टिप्पणी करणे पूर्णपणे टाळत आहे.
वृदधिमान साहा रणजी ट्रॉफीच्या पहिल्या टप्प्यातही खेळला नव्हता. आयपीएलपूर्वी पहिला टप्पा खेळला गेला. त्याला भारतीय कसोटी संघातूनही वगळण्यात आले होते. इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघातही त्याला संधी मिळालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

