🕒 1 min read
मुंबई: आपण सर्वजण जे टीव्हीवर आयपीएलचे सामने बघतो यासाठी एक विशिष्ट पद्धतीने नियमावली ठरवलेली असते. आपल्याला कधी प्रश्न पडत असेल की आयपीएल एका ठराविक चॅनेलवरतीच का दाखवले जाते. तर हे आयपीएलचे सामने दाखवण्याचा अधिकार कोणत्या टीव्ही चॅनल ला असतात याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आयपीएल २०२२ चा १५ वा हंगाम नुकताच संपला असून या सपर्धेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुढच्या सीजनसाठी आयपीएलच्या मीडिया ब्रॉडकास्ट राइट्सचा (IPL Media Rights) लिलाव होणार आहे. २०२३ ते २०२४ हंगामासाठी मीडिया राइट्स विकले जाणार आहेत. मीडिया राइट्ससाठी बोलीची रक्कम अंदाजे ५० ते ६० हजार कोटीपर्यंत जाऊ शकते. आयपीएल मीडिया राइट्ससाठी टेंडर आधीच निघालं असून एकूण पाच कंपन्यांमध्ये चुरस आहे. यावेळी BCCI च्या तिजोरीत घसघशीत रक्कम जमा होणार आहे. याआधी सुद्धा मीडिया ब्रॉडकास्ट राइट्सचा लिलाव झाला होता. तेव्हा बीसीसीआयला मोठी रक्कम मिळाली होती. यापूर्वी २०१८ ते २०२२ असं चार वर्षांसाठी मीडिया राइट्सचा लिलाव झाला होता. त्यावेळी बीसीसीआयला १६,३०० कोटी रुपये मिळाले होते. यावेळी बीसीसीआयच्या तिजोरीत तीन ते चार पट जास्त रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
मीडिया ब्रॉडकास्ट राईट्स लिलाव बाबतच्या महत्वाच्या गोष्टी
क्रिकबजच्या वृत्तानुसार, चार पॅकेजसाठी हा लिलाव होईल. भारतीय उपखंडातील टीव्ही, डिजिटल प्लॅटफॉर्म, भारतीय डिजिटलसाठी स्पेशल पॅकेज आणि उर्वरित जगाचा समावेश आहे. बीसीसीआय या लिलावासाठी व्हर्चुअल वर्कशॉप आणि मॉक ऑक्शनही करतेय. मीडिया राइट्स मिळवण्याच्या स्पर्धेतील कंपन्यांना सर्व प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी हे सुरु आहे. टीव्ही राइट्सचा लिलाव ४९ कोटी रुपयापासून सुरु होईल. डिजिटल राइट्सचा लिलाव 33 कोटीपासून सुरु होईल. एकदा बोली लावल्यानंतर पुढची बोली लावण्यासाठी 30 मिनिटाचा वेळ दिला जाईल.
IPL Media Rights Auction example:
– Star Sports starts the bid for TV rights at 49cr, then the next bid will be 49.5cr then 50cr and so on.
– Amazon starts the bid for Digital rights at 33cr, then the next bid will be 33.5cr then 34cr and so on.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 7, 2022
एकूण १० संघ
आयपीएल २०२२ मध्ये एकूण १० संघ होते. पुढच्या सीजनमध्येही एवढेच संघ असतील. त्यामुळे आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाली आहे. १० संघ झाल्यानंतर रोमांच वाढेल अशी अपेक्षा होती. पण टीव्ही रेटिंग्सच्या हिशोबाने पहिला सीजन खास राहिला नाही. टीआरपीमध्येही मोठी पडझड झाली. पुढच्या सीजनमध्ये आयपीएलच्या टीआरपीमध्ये वाढ करण्याचं बीसीसीआयचं प्रमुख लक्ष्य असेल. इंडियम प्रीमियर लीग जगातील एक यशस्वी लीग स्पर्धा आहे. जगातील नावाजलेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. इथे चांगल्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतो.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
