🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२ चा हंगाम क्रिकेटरसिकांसाठी मनोरंजक असणार आहे. स्पर्धा सुरु होण्याआधी सर्वांच्या नजरा १२ आणि १३ फेब्रुवारीला होणाऱ्या आयपीएल मेगा ऑक्शनकडे लागल्या आहेत. मात्र त्याआधीच पंजाब किंग्स संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. मेगा ऑक्शनला एक दिवस बाकी असताना कोचने राजीनामा दिला आहे.
आयपीएल मेगा ऑक्शनला एक दिवस बाकी असताना संघाचे फलंदाजी कोच वसीम जाफर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विटरवरून राजीनामा जाहीर केला आहे. वसीम जाफरचे अचानक पंजाब सोडणे सगळ्यांसाठीच धक्कादायक ठरले आहे. जाफर यांनी ट्विटरवर त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटातील रणबीरचा ‘चन्ना मेरेया’ गाण्याचा फोटो टाकत एक संदेश सुद्धा लिहला आहे. ज्यात त्यांनी लिहले ” अच्छा चलता हुं.., अनिल कुंबळे आणि संघाचे धन्यवाद तसेच तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”
Adios, and thank you @PunjabKingsIPL, it's been a pleasure. Wishing @anilkumble1074 and the team very best for #IPL2022 ???? pic.twitter.com/rDivb0akZp
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 10, 2022
वसीम जाफरला पंजाब किंग्सने २०१९ संघात जोडले होते. सध्या पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आहेत तर गोलंदाजी प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचे डॅमियन राइट आहेत. दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून संघात आहेत. पंजाब किंग्सला एकदाही आयपीएल संघाचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. पंजाब किंग्स यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये कर्णधारच्या शोधात होते. आता मात्र त्यांना फलंदाजी कोच सुद्धा शोधावा लागेल असे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना आज रंगणार
- विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट
- “कधी जीभ तर कधी पाय घरसणाऱ्याचा भाजप सत्कार करतय”, रुपाली पाटलांचा टोला
- IPL 2022 AUCTION: आयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आणि वेळ जाहीर ; जाणून घ्या कधी होईल सुरुवात
- “सोमय्यांवरील हल्ला महागात पडेल”, चंद्रकांत पाटलांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
