Share

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना आज रंगणार

Published On: 

मुंबई: रोहित शर्माने पूर्णवेळ कर्णधार म्हणून मालिका विजयासह सुरुवात करणार आहे. कारण भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-०अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारतीय संघासाठी हा सलग ११वा एकदिवसीय मालिका विजय असणार आहे.

दुसऱ्या सामन्यात २३८ धावांचा पाठलाग करताना विंडीज केवळ १९३ धावांवर सर्वबाद झाला. तर पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विंडीजला १७८ धावा पूर्ण करत ६ विकेट्सने पराभूत केले आहे. या मालिकेत विराट कोहलीला सूर गवसेल अशी अपेक्षा चाहत्यांची होती मात्र तो अजूनही खराब कामगिरीचा सामना करत आहे. मात्र त्याविरुद्ध रोहित शर्माने कर्णधार आणि फलंदाज म्हणून अप्रतिम कामगिरी केली आहे. कर्णधार म्हणून मालिका विजय मिळवणाऱ्या रोहितचे सगळी कडून कौतुक होत आहे. चाहत्यांसोबतच माजी खेळाडू आणि पत्रकारांनीही रोहितचे कौतुक केले आहे.

रोहित शर्माची पूर्णवेळ कर्णधार म्हणून हा पहिला मालिका विजय असणार आहे. १०००व्या एकदिवसीय सामन्यांसोबत विजयी सुरुवात केल्यानंतर भारताने मालिका विजय केला आहे. २००७ पासून सुरु झालेले विंडीज विरुद्ध मालिकेचे विजयी रथ भारतीय संघाने अजूनही कायम ठेवले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!