Share

विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट

Published On: 

नवी-दिल्ली : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली.

यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘माझ्या मतदारसंघातून जाणाऱ्या विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. मतदारसंघातून जाणारा चाकण-शिक्रापूर-न्हावरे-श्रीगोंदा-जामखेड-बीड या ५४८ D या प्रमुख महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या पवार साहेबांच्या उपस्थितीत नगरमध्ये झालेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात जामखेड-सौताडा या टप्प्यास गडकरी साहेबांनी मान्यता दिली होती.त्यासाठी तसंच केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत मतदारसंघातील राज्य व इतर रस्त्यांच्या कामांसाठी निधी देण्याची विनंती यावेळी केली.’

दरम्यान, पैठण ते पंढरपूर या ७५२E पालखी महामार्गावरील खर्डा ते कुर्डुवाडी हा टप्पा राष्ट्रीयमार्ग म्हणून घोषित करण्याच्या मागणीचाही यावेळी पाठपुरावा केला. हा महामार्ग पूर्ण झाल्यास पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसह नगर,पुणे,उस्मानाबाद,औरंगाबाद, सोलापूर या जिल्ह्यांनाही फायदा होईल. तसंच नगर-करमाळा-टेंभुर्णी हा ५१६ A मार्ग मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने दळणवळणालाही मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळं या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची विनंतीही यावेळी गडकरी साहेबांकडे केली. याकामी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, असेही रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!