Share

IPL 2022 AUCTION: आयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आणि वेळ जाहीर ; जाणून घ्या कधी होईल सुरुवात

Published On: 

मुंबई: आयपीएल मेगा ऑक्शनसाठी (IPL Mega Auction 2022) अधिकृत तारीख आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १२ आणि १३ फेब्रुवारीला बँगलोर येथे ऑक्शन होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर मेगा ऑक्शन दोन दिवस सकाळी ११ वाजल्यापासून बघता येणार आहे. यावर्षी आयपीएलचे स्पॉन्सरशिप विवो कडून टाटाकडे गेले आहे. त्यामुळे यंदाचे आयपीएल टाटा आयपीएल म्हणून ओळखले जाणार आहे.

यंदाच्या हंगामापासून २ नवीन संघाना स्पर्धेचे भाग बनवण्यात आलें आहे. त्यामुळे यावेळी स्पर्धेत ७४ सामने खेळले जाण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. मेगा ऑक्शनमध्ये ५९० खेळाडूंचा समावेश असणार आहे. ज्यात अनेक मोठ्या नावाचाही समावेश आहे. यंदा अनेक संघ नवीन कर्णधारच्याही शोधात असल्याने ऑक्शनमधील बोलींमध्ये मोठी चढाओढ दिसणार आहे.

बीसीसीआयने IPL 2022 मेगा ऑक्शन ५९० खेळाडूंची यादी अंतिम केली. यामध्ये ३७० भारतीय खेळाडू आहेत तर २७० परदेशी खेळाडू आहेत. परदेशी खेळाडू ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या देशांतील आहेत. आतापर्यंत १० संघानी ३३ खेळाडूंना आधीच रिटेन केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!