मुंबई : काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेमध्ये (PMC) जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी (Shivsainik) धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की होत असताना ते पायऱ्यांवरून घसरून पडले. तद्पश्चात राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून चांगलाच वाद पेटलेला दिसून येत आहे. तसेच यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने रंगत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी किरीट सोमय्यांवरील हल्ला महागात पडेल, असा इशारा दिला आहे. तसेच यासंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहा(Amit Shah) यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.
यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याच्या संदर्भात मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली आहे.’ तसेच भाजप हा विषय कधीही सोडणार नाही, असेही पाटील म्हणाले आहेत.
भाजपाचे माजी खासदार किरीट जी सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याच्या संदर्भात मी केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांच्याकडे तक्रार केली आहे. भाजपा हा विषय कधीही सोडणार नाही. pic.twitter.com/GY2HMA8C7e
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 10, 2022
दरम्यान, या घटनेनंतर आज(११ फेब्रु.)पुन्हा एकदा किरीट सोमय्या हे पुणे (Pune) दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे आज पुण्यात काय चित्र बघायला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- नितेश राणेंचा फडणवीसांसोबत बंद खोलीत संवाद; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- ‘लबाड लांडगा ढोंग करतंय’, रुपाली पाटलांचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल
- “सोनिया गांधींच्या निवासस्थानाचे भाडे वर्षोनुवर्षे थकीत राहणे त्यांच्या लुटारू मानसिकतेचे प्रतीक”
- IPL 2022: कोच नेहराच्या बोलण्यावर गुजरात टायटन्स ‘या’ तीन खेळाडूंना विकत घेणार!?
- ‘त्या’ घटनेनंतर किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर


