Share

IPL 2022 ठरतंय कंटाळवाणं..? सामने सुरू असताना BCCIला बसला ‘मोठा’ धक्का!

Published On: 

मुंबई : सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलला बीसीसीआयला सर्वात मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या दर्शकसंख्येत घट झाली आहे. ही घट ३३ टक्के एवढी आहे. बीएआरसीच्या अहवालानुसार पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात आयपीएलच्या दर्शकांमध्ये घट झाली आहे.

टीआरपी मोजणाऱ्या बीएआरसीच्या मते, पहिल्या आठवड्यात व्ह्यूअरशिप २६७ मिलियन होती. त्यात १४ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. मागील हंगामात असे काही घडले नव्हते, आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे. बीएआरसी किमान एक मिनिट आयपीएल पाहणाऱ्या दर्शकाचा यूजर म्हणून गणना करतो.

मात्र, चेन्नई सुपर किंग्ज आणि केकेआर यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याशिवाय पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यालाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. सुरुवातीच्या आठवड्यानंतर प्रेक्षकांच्या संख्येत घट झाल्याचे प्रथमच दिसून आले आहे.

या हंगामात दोन नवीन संघांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक हंगामाच्या तुलनेत यावेळी सामन्यांची संख्या अधिक आहे. बीसीसीआयने पुढील हंगामापासून पाच वर्षांसाठी मीडिया हक्कांसाठी बोली मागवल्या आहेत. या मीडिया हक्कांसाठी तब्बल ३३ हजार कोटी इतरी रक्कम ठरवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!