Share

IPL 2022 CSK vs SRH : तुम्हाला माहितीये दोन संघांमध्ये कोण आहे दमदार? वाचा काय सांगतोय इतिहास!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२चा १७वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता खेळवला जाईल. दोन्ही संघांनी आयपीएलच्या या मोसमातील सुरुवातीचे सर्व सामने गमावले आहेत आणि अशा परिस्थितीत हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नईसमोर विजेतेपद वाचवण्याचे आव्हान असले तरी संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. तीन सामन्यांत तीन पराभव झाल्याने पुढचा रस्ता कठीण झाला आहे. संघ ठोस प्रयत्न करण्यात अपयशी ठरला असून आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी ही सर्वात मोठी अडचण ठरत आहे. संघातील अनेक प्रमुख फलंदाज फॉर्मात नाहीत.

दोन्ही संघाच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने १२ सामने जिंकले असून सनरायझर्स हैदराबादने ४ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील मागील पाच सामन्यांमध्ये चेन्नईने चार सामने जिंकले आहेत. हैदराबादविरुद्ध चेन्नईच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये, धोनीने सर्वाधिक (३५०) धावा केल्या आहेत. तर हैदराबादच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये कर्णधार केन विल्यमसनने चेन्नईविरुद्ध (३३८) धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!