🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवला जात आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सीएसकेला वेगवान गोलंदाज दीपक चहरची उणीव आहे. दीपक दुखापतग्रस्त असून तो आयपीएलच्या मध्यानंतर संघात सामील होण्याची शक्यता आहे. १५व्या मोसमात सीएसकेने सलग तीन सामने गमावले आहेत. या सामन्यात चेन्नईचा संघ पहिला विजय नोंदवण्याच्या इराद्याने उतरणार आहे. त्याचवेळी हैदराबाद संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत.
दोन्ही संघांची Playing XI
चेन्नई सुपर किंग्ज – रॉबिन उथप्पा, रुतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कप्तान), शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महेश थिक्ष्णा, मुकेश चौधरी.
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन, उमरान मलिक, टी. नटराजन.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 नंतर टीम इंडिया काय करणार? ‘या’ संघाविरुद्ध खेळणार सराव सामने!
- “तुकाई सिंचन योजना लवकरच होणार सुरु”, रोहित पवारांची माहिती
- IPL 2022 CSK vs SRH : तुम्हाला माहितीये दोन संघांमध्ये कोण आहे दमदार? वाचा काय सांगतोय इतिहास!
- “गतवैभव पुन्हा प्राप्त करायचे असेल तर संविधानाच्या…”, प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान
- सोमय्यांना पोलिसांची नोटीस, सोमय्या दिल्लीला रवाना
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
