🕒 1 min read
मुंबई: भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात ज्याने एकमेव सुवर्णकाळ आणला, भारताला “विश्वगुरू” केले तो राज्यकर्ता म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक. सर्व धर्मीयांचा आदर, सर्व जनतेप्रती करुणेचा भाव ही अशोकाच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती. असे म्हणत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सम्राट अशोक जयंती दिनी अभिवादन करणारे ट्वीट केले आहे.
नंतरच्या काळात ज्यांनी मौर्य साम्राज्याचा अंत केला, ते द्वेषाने प्रेरित होते.बौद्धांप्रती द्वेषाच्या आधारावर त्यांनी राज्यकारभार केला आणि देशाला अंधार युगात ढकलले.यातून धडा घेतला पाहिजे.संविधानाच्या माध्यमातून नवीन सुरुवात झाली आहे. गतवैभव पुन्हा प्राप्त करायचे असेल तर संविधानाच्या,सम्राट अशोकाच्या मार्गानेच जावे लागेल. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत संबंधी अनेक गंभीर आरोप राऊत यांनी केले आहे. तसेच कालच ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या (sharad pawar) निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
पवारांना इनामात ब्रिटिश सोडून गेले की महात्मा गांधी?; निलेश राणेंचा खोचक सवाल
सोमय्यांना पोलिसांची नोटीस, सोमय्या दिल्लीला रवाना
“…तरच धार्मिक तेढ वाढविणारी ‘ब्लू प्रिंट’ अपयशी ठरेल”, राष्ट्रवादीचा हल्लाबोल
शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा मी निषेध करते- ममता बॅनर्जी
IPL 2022: अमित मिश्राने उडवली CSKची खिल्ली; म्हणाला ‘संघात खेळायला मी अजून दोन वर्षे…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
