Share

धोनीनंतर ‘हा’ खतरनाक खेळाडू होणार CSKचा कर्णधार? ३ वेळा जिंकली आहे आयपीएल ट्रॉफी 

Published On: 

नवी दिल्ली : भारतात कर्णधार म्हणून जर एखाद्या खेळाडूचे नाव प्रथम मनात आले तर ते नक्कीच महेंद्रसिंह धोनीचे असेल. क्रिकेटमध्ये कर्णधार हा एका सेनापती सारखा असतो जो संपूर्ण संघाला सोबत घेऊन जातो आणि त्यात धोनीचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. धोनीने आपल्या शांत आणि हुशार मनाने कर्णधारपदाची नवी व्याख्या तयार केली आहे. पण धोनीनंतर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार कोण असेल असा प्रश्न सर्व क्रिकेटप्रेमींना पडला आहे. यासाठी सीएसकेच्या एका खतरनाक खेळाडूचे नाव समोर आले आहे.

महेंद्रसिंह धोनीची गणना जगातील महान कर्णधारांमध्ये केली जाते. डीआरएस घेण्याची त्याची कला सर्वांनाच अवगत आहे. धोनी विकेटच्या मागे राहतो आणि गोलंदाजांना योग्य सल्ला देतो. या खेळाडूने आयपीएलच्या २०४ सामन्यांमध्ये १२१ सामने जिंकले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली, चेन्नई सुपर किंग्जने ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आणि आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारा तो खेळाडू आहे. धोनीसारख्या मोठ्या कर्णधाराच्या जागी सीएसकेमध्ये एक खेळाडू आहे ज्यामध्ये स्वतःच्या जोरावर सामना फिरवण्याची क्षमता आहे.

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा महेंद्रसिंग धोनीच्या जागी कर्णधारपदासाठी सर्वात मोठा दावेदार आहे. कारण चालू वर्षाच्या रिटेनशनमध्ये जडेजाला धोनीपेक्षा जास्त पैसे देऊन कायम ठेवण्यात आले आहे. सीएसके संघाच्या मालकाला जडेजाला दीर्घकाळ संघात कायम ठेवायचे आहे. जडेजा त्याच्या शानदार फलंदाजीसोबतच त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. क्षेत्ररक्षणात त्याचा सामना नाही. आयपीएल २०२१ मध्ये आरसीबी विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात जडेजाने हर्षल पटेलच्या एका षटकात ३७ काढल्या होत्या. आयपीएलमध्ये जडेजाने एकूण २०० सामन्यांमध्ये २३८६ धावा केल्या आहेत आणि १२७ विकेट्सही घेतल्या आहेत. जडेजामध्ये कर्णधार बनण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत.

रवींद्र जडेजा हा संघासाठी त्रिशूलसारखा आहे. जो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सर्वत्र बसतो. रवींद्र जडेजाने आपल्या कामगिरीने चेन्नईला अंतिम फेरीत नेण्यात मोठे योगदान दिले आहे. जडेजाने डेथ ओव्हर्समध्ये झंझावाती फलंदाजी करून महत्वाच्या प्रसंगी संघाला संकटातून बाहेर काढले आहे. जडेजाने संघासह तीन आयपीएल ट्रॉफीही जिंकल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!