भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रमीझ राजा यांच्या मते, दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय मालिका व्हायला हवी कारण जेव्हा हे दोन संघ स्पर्धा करतात तेव्हा ते जगभर पाहायला मिळते.
रमीझ राजा पीसीबीचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू करण्यासाठी वकिली करत आहेत. अलीकडेच त्यांनी भारत-पाकिस्तानसह ४ संघांचा समावेश असलेली चतुर्भुज मालिकाही सुचवली होती. एका पाकिस्तानी मीडिया हाऊसच्या रिपोर्टमध्ये रमीझ राजाच्या प्लॅनचा उल्लेख करण्यात आला होता.
रमीझ राजा म्हणाले, माझ्या मनात रग्बी सिक्स नेशन-शैलीच्या मालिकेचा प्रस्ताव ठेवण्याची योजना आहे. ही चार देशांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका आहे ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ खेळू शकतात. हा प्रस्ताव आयसीसीच्या बैठकीत ठेवण्याचा मी विचार करत असल्याचे रमीझ राजा यांनी सांगितले.
रमीझ राजा यांच्या मते, “दोन्ही देशांमधील सामने सर्वाधिक पाहिले जातात. ते म्हणाले, टी-२० वर्ल्डकपच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, जेव्हा पाकिस्तान आणि भारत सामना झाला तेव्हा तो सर्वाधिक पाहिला गेला. चाहत्यांना काय हवंय ते पाहावं लागेल आणि त्यानुसार गोष्टी कराव्या लागतील. खेळ आणि चाहत्यांच्या फायद्यासाठी आपल्याला सर्व अडथळे तोडावे लागतील.”
महत्वाच्या बातम्या :
“…तर लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे निर्णय घेतील”, अजित पवारांचे स्पष्टीकरण
गोव्यात कॉंग्रेसला ४० पैकी ४५ जागा मिळतील, आमच्या शुभेच्छा; संजय राऊतांचा खोचक टोला
मालिकेतून बाहेर काढल्यानंतर अभिनेता किरण माने घेणार शरद पवारांची भेट?
नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू


