Share

कंगनाच्या गालापेक्षाही नितळ रस्ते बनवणार,काँग्रेस आमदाराचे गजब वक्तव्य

Published On: 

मुंबई : राजकारण्यांनी आपल्या आदर्श रस्त्यांची तुलना अभिनेत्रींच्या गालाशी करणे काही नवीन नाही. आता चक्क काँग्रेसचे आमदार डॉ इरफान अन्सारी (Congress MLA Dr Irfan Ansari) यांनी आपल्या झारखंडमधील (Jharkhand) जामतारा या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री कंगना राणौतच्या (actor Kangana Ranaut) गालापेक्षाही गुळगुळीत होतील, असे आश्वासन देत गजब वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत.

दरम्यान त्यांनी शुक्रवारी पोस्ट केलेल्या स्वत: तयार केलेल्या व्हिडिओमध्ये, डॉ इरफान अन्सारी यांना असे म्हणाले, “जमातारा येथे १४ जागतिक दर्जाच्या रस्त्यांचे बांधकाम लवकरच सुरू होईल. चित्रपट अभिनेत्री कंगना रणौतच्या गालापेक्षा रस्ते गुळगुळीत होतील याची मी खात्री देतो.” डॉ.अन्सारी या आठवड्याच्या सुरुवातीला चर्चेत होते जेव्हा त्यांनी असा दावा केला होता की, एखाद्याने जास्त काळ फेस मास्क घालू नये कारण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.

देशात कोविड-१९ प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना अन्सारी यांच्या वक्तव्याचा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि पक्षाच्या सहकाऱ्यांनी जोरदार निषेध केला. आता त्यांनी आपल्या ताज्या वक्तव्याने पुन्हा खळबळ उडवून दिली आहे.

यापूर्वी २००५मध्ये लालू यादव यांनी एकदा बॉलिवूडची डीम गर्ल आणि भाजप नेत्या हेमा मालिनी यांच्या गालापेक्षा बिहारचे रस्ते गुळगुळीत करू म्हटले होते. तसेच नोव्हेंबर २०२१ मध्ये, राजस्थानचे नवनियुक्त मंत्री राजेंद्र सिंह गुडा यांनी राज्याच्या रस्त्यांची अभिनेत्री कतरिना कैफच्या गालाशी तुलना करणारी टिप्पणी व्हायरल झाल्यानंतर वादात सापडले होते. गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची हेमा मालिनी यांच्या गालाशी तुलना करून केलेल्या वक्तव्यावर राज्य महिला आयोगाने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली होती. आता नुकतेच काँग्रेसचे आमदार डॉ इरफान अन्सारी यांनी केलेल्या रस्त्यांबद्दल वक्तव्यामुळे पुन्हा एकदा हा वाद समोर येत आहे.

 

महत्वाच्या बातम्या:

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!