पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना एक मोठे वक्तव्य केले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गुडे यांची निवड करण्यात आली आहे. यावरच बोलताना त्यांनी राज्यातील लॉकडाऊनबाबतही मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray )यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला आहे.
नागरीकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरु केलेली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील. असे अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, बोलण्याच्या ओघात अजित पवारांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला असावा, असाही तर्क आता काढला जातो आहे. मात्र त्यांच्या या विधानामुळे आता वेगळ्याच चर्चांना उधान येण्याची शक्यता आहे.
दरम्यान पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गुडे यांची निवड करण्यात आली आहे. तर सुनील चांदेरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. एकमताने ही निवड करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच दिगंबर दुर्गुडे यांनी पारदर्शक कारभार करावा अशा सूचना त्यांना दिल्या असल्याचेही पवारांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मालिकेतून बाहेर काढल्यानंतर अभिनेता किरण माने घेणार शरद पवारांची भेट?
- “धर्माच्या नावाखाली चालणारे भाजपचे राजकारण लोकांनी नाकारले”, नवाब मलिकांचे टीकास्त्र
- औरंगाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा!
- औरंगाबादकरांसाठी सुखावह बातमी; लवकरच होणार खाम नदीचे लोकार्पण!
- पुण्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात वाढले १० हजाराहून अधिक रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

