Share

सलमान खानचं शेजाऱ्याशी भांडण; वाद गेला थेट कोर्टात

Published On: 

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमी चर्चेत असतो. तो आपल्या पनवेल इथल्या फार्महाऊसमधले फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. लॉकडाउनमध्येही सलमान त्याच्या या पनवेल इथल्या घरामध्ये राहत होता. मात्र नुकतच मुंबईतील मालाड येथील रहिवासी केतन कक्कर (Ketan Kakkar) याच्या विरोधात मानहानीचा खटला (defamation case ) दाखल केला आहे.

दरम्यान मिळालेल्या वृत्तानुसार, सलमान खाननं त्याच्या शेजाऱ्याविरोधात म्हणजेच केतन कक्कर विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यानं म्हटलं आहे की, सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट केल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास झाला. यावर बंदी घातली पाहिजे.

 

काय आहे प्रकरण

सलमानचा असा आरोप आहे की, ‘एका यूट्यूब चॅनलसाठी मुलाखत देताना केतनने त्याची बदनामी केली.’ या शोचा भाग असलेल्या इतर दोन जणांना याच प्रकरणात पक्षकार (party in this case ) करण्यात आले होते. याशिवाय गुगल, यूट्यूब, ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया कंपन्यांनाही(social media defamation suit against YouTube channel) पक्षकार करण्यात आलं आहे.

त्यानंतर आता केतन कक्कर यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टाला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. केतन कक्कर यांनी यूट्यूब चॅनेलवरून सलमानबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर केला. हा दावा दाखल झाल्यानंतर न्यायालयानं कक्कर यांना उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात पुढची सुनावणी २१ जानेवारीला होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!