Share

IPL 2022: हैदराबादवर शानदार विजयानंतरही राहुल मात्र नाराज; ‘या’ खेळाडूंना फटकारले

Published On: 

मुंबई: के एल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने (SRH vs LSG) आयपीएलच्या १२व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून मोसमातील त्यांचा दुसरा विजय मिळवला आहे. जिथे नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या लखनऊने हैदराबादला १७० धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात सनरायझर्सला ९ गडी गमावून १५७ धावाच करता आल्या. त्यामुळे सुपर जायंट्सने हा सामना १२ धावांनी जिंकला. सामना संपल्यानंतर विजयी कर्णधार के. एल राहुलने मात्र काही खेळाडूंना फटकारले आहे.

संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना के. एल राहुल (KL Rahul) म्हणाला, ” या सामन्यात आनंदाची गोष्ट म्हणजे, आम्हाला स्वतःला जिंकण्याची संधी देण्याचा मार्ग सापडला आहे. आम्ही आज पुन्हा तेच केले. पहिल्या चार षटकांत तीन विकेट गमावणे अजिबात चांगले नव्हते, त्यामुळे आमची कामगिरी खाली जाईल असे नाही. पण एक फलंदाजी गट म्हणून कोणतीही जोखीम न घेता कसे खेळायचे हे शिकायला हवे. आणि चेंडूसह आम्ही तिन्ही सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि आम्हाला ते पुढे नेण्याची गरज आहे.” अशा शब्दात के एलने अप्रत्यक्षरित्या मधल्या फळीतील फलंदाजांना फटकारले आहे.

पुढे, दीपक हुड्डा (Deepak hooda) यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, के. एल राहुल म्हणाला, “मी गेल्या ३-४ सीझनपासून त्याच्यासोबत (हुडा) खेळत आहे आणि आम्ही खूप बोलतो. त्याला नेटमध्ये फलंदाजी करायला आवडते. तो शिकण्यास उत्सुक आहे, मधल्या फळीत आपण ज्यावर विश्वास ठेवू शकतो असा तो बनला आहे. आज त्याने ज्याप्रकारे दडपणाखाली फलंदाजी केली त्यामुळे मी खूश आहे. भविष्यात तो अधिक चांगला होईल अशी आशा आहे.”

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!