Share

VIDEO : “आजही तुझ्या चेहऱ्यावर…”, रॉस टेलरच्या निवृत्तीवर विराट काय म्हणाला माहितीये?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : न्यूझीलंडचा महान फलंदाज रॉस टेलरने काल आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप दिला. हॅमिल्टनमधील नेदरलँड्सविरुद्धचा एकदिवसीय सामना हा टेलरच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. या अनुभवी खेळाडूला न्यूझीलंडच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानले जाते आणि त्याने दीर्घकाळ संघाच्या यशात योगदान दिले आहे.

आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, टेलरने ११२ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि १०२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. रॉस टेलरने २००६ मध्ये एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर पुढील वर्षी त्याने कसोटी पदार्पण केले. टेलरच्या निवृत्तीबद्दल जगभरातील दिग्गज खेळाडूंच्या प्रतिक्रिया समोर आल्या आणि त्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे.

https://twitter.com/BLACKCAPS/status/1510455801265078274

न्यूझीलंड क्रिकेटने ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये विराटने टेलरचे त्याच्या शानदार कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले आहे आणि त्याला एक लीजेंड म्हटले आहे. ”रॉस टेलरचे न्यूझीलंडमधील अप्रतिम कारकीर्दीबद्दल अभिनंदन. न्यूझीलंड क्रिकेटसाठी तू एक लीजेंड आहेस. तू खेळाचा उत्तम राजदूत आहेस. आम्ही एकत्र काही छान आठवणी शेअर केल्या. ऑल द बेस्ट रॉस. मला खात्री आहे की इतक्या वर्षांपासून असलेले ते आयकॉनिक हास्य आजही तुझ्या चेहऱ्यावर असेल”, असे विराटने म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!