🕒 1 min read
मुंबई : ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) ने गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा ३७ सदस्यीय ऍथलेटिक्स संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा करणार आहे. निवड समितीने अपेक्षेप्रमाणे खेळाडूंची निवड केली आहे. त्याचबरोबर एकाही आश्चर्यकारक नावाला संघात स्थान मिळाले नाही. एएफआयच्या निवड समितीने निवडलेल्या ३७ सदस्यीय संघात १८ महिला खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये स्टार धावपटू हिमा दास आणि दुती चंद यांचा समावेश आहे. यांना महिलांच्या ४×१०० मीटर रिले संघात स्थान देण्यात आले आहे.
निवडकर्त्यांनी पुरुषांच्या ४×१०० मीटर रिले संघाचीही निवड केली आहे. यामध्ये अविनाश साबळे ज्याने अलीकडेच आठव्यांदा आपला ३००० मीटर स्टीपलचेस राष्ट्रीय विक्रम मोडला होता. त्याचबरोबर गेल्या महिन्यात दोनदा स्वतःचा १०० मीटर राष्ट्रीय विक्रम मोडणारी ज्योती याराजी यांनाही संघात स्थान मिळाले आहे.
चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये १४.१४ मीटरच्या प्रयत्नाने तिहेरी उडीत स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडणारी ऐश्वर्या बाबू देखील या संघाचा भाग आहे. २०० मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम रचणारा अमलान बोरगोहेनला संघात स्थान मिळू शकले नाही कारण तो एएफआयद्वारे निर्धारित राष्ट्रकुल क्रीडा पात्रता पातळी गाठण्यात अपयशी ठरला होता.
निवडलेल्या काही खेळाडूंना मात्र बर्मिंगहॅम गेम्सपूर्वी त्यांचा फॉर्म आणि फिटनेस परत मिळवावा लागेल. सीमा पुनिया या अनुभवी डिस्कस थ्रोअरला तिची मागील कामगिरी लक्षात घेऊन पाचव्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र तिला अमेरिकेतील स्पर्धेदरम्यान एएफआयने निर्धारित केलेली पात्रता पातळी गाठावी लागेल. पुनियाने आतापर्यंत चार वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत पदके जिंकली आहेत.
एएफआयचे अध्यक्ष अदिले सुमारीवाला म्हणाले की, “सीमा पुनियाचे राष्ट्रकुल स्पर्धेत प्रतिनिधित्व करणे पूर्णपणे तिच्या अमेरिकेतील कामगिरीवर अवलंबून असेल.” भूतकाळातील राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमधील तीची कामगिरी पाहता आम्ही तीला अमेरिकेत प्रशिक्षण आणि स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली आहे. सीमा पुनियाने १० ते १४ जून या कालावधीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत निवडीसाठी पात्रता स्पर्धा असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला नव्हता.
बर्मिंगहॅम गेम्ससाठी तीन भारतीय पुरुष भालाफेक स्पर्धेत भाग घेतील. या स्पर्धेत नीरज चोप्रा याच्यासह डीपी मनू आणि रोहित यादव भारतासाठी आव्हान सादर करतील. अब्दुल्ला अबुबाकर, प्रवीण चित्रवेल आणि अल्डोस पॉल यांना पुरुषांच्या तिहेरी उडीसाठी संघात स्थान मिळाले आहे.
सुमारीवाला म्हणाले की, “आम्ही भारतीय ऑलिम्पिक संघटनेला विनंती करत आहोत की आमचा कोटा एकने वाढवावा आणि काही खेळाडूंना ओळखपत्र मिळण्यास मदत करावी.” आम्ही काही खेळाडूंचाही समावेश केला आहे ज्यांना खेळापूर्वी त्यांची फिटनेस आणि फॉर्म सिद्ध करावा लागेल. २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या खेळांसाठी एएफआयला भारतीय संघात ३६ कोटा स्थान देण्यात आले आहेत.
शॉट थ्रोअर तेजिंदरपाल सिंग तूरला कझाकस्तानमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. तर अमोज जेकबला ४×४०० मीटर रिले संघात आपला फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करावा लागेल. आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये भारत अ संघासाठी अंतिम फेरीत धावताना जेकबच्या पायाला दुखापत झाली होती.
सुमारीवाला म्हणाले की, डिस्कस थ्रोअर नवजीत कौर ढिल्लन आणि सीमा अंतिल पुनिया, वायर थ्रोअर सरिता सिंग यांना कझाकिस्तान किंवा कॅलिफोर्नियामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. त्याचबरोबर वॉकिंगपटू भावना जाट हिला तिचा फिटनेस सिद्ध करावा लागेल. राष्ट्रीय विक्रम रचलेली तेजस्वी शंकरला राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये भाग न घेतल्याने आणि त्यात सहभागी होण्यापासून सूट न मागितल्याने तिला संघात स्थान मिळालेले नाही.
अशाप्रकारे आहे ३७ सदस्यीय संघ
पुरुष: अविनाश साबळे (३००० मीटर स्टीपलचेस), नितेंदर रावत (मॅरेथॉन), एम श्रीशंकर आणि मोहम्मद अनीस याहिया (लांब उडी), अब्दुल्ला अबुबकर, प्रवीण चित्रवेल आणि एल्डोस पॉल (ट्रिपलचेस), तेजिंदरपाल सिंग तूर (शॉट थ्रो) ), नीरज चोप्रा, डीपी मनू आणि रोहित यादव (भालाफेक), संदीप कुमार आणि अमित खत्री (चालणे) अमोज जेकब, नोहा निर्मल टॉम, अरोकिया राजीव, मोहम्मद अजमल, नागनाथन पांडी आणि राजेश रमेश (४×४०० मीटर रिले).
महिला: एस धनलक्ष्मी (१०० मी आणि ४×४०० मीटर रिले), ज्योती याराजी (१०० मीटर अडथळा शर्यत), ऐश्वर्या बी (लांब उडी आणि तिहेरी उडी) आणि अँसी सोजन (लांब उडी), मनप्रीत कौर (शॉट थ्रो), नवजीत कौर धिल्लॉन आणि सीमा अंतिल पुनिया ( डिस्कस थ्रो), अन्नू राणी आणि शिल्पा राणी (भालाफेक), मंजू बाला सिंग आणि सरिता रोमित सिंग (वायर शॉट), भावना जाट आणि प्रियांका गोस्वामी (चालणे), हिमा दास, दुती चंद, श्रावणी नंदा, एमव्ही जिलाना आणि एनएस सिमी ( ४×१०० मीटर रिले).
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
