IPL 2022 वर पुन्हा कोरोनाचे सावट! दिल्ली संघात कोरोना पॉसिटीव्ह केस मिळाल्याने खळबळ

मुंबई: आयपीएल २०२२ स्पर्धा तिसऱ्या आठवड्यात पोहोचली आहे, आता क्रिकेटच्या या महाकुंभाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र त्याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोविडच्या विळख्यात आले आहेत. सध्या त्याला फ्रँचायझीच्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत तो पॉझिटिव्ह आढळल्याने आता आयपीएलची स्पर्धाही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

आज म्हणजेच १५ एप्रिल रोजी आयपीएलने जारी केलेल्या माहितीनुसार,स्पर्धेत पहिल्या कोविड पॉझिटिव्ह केसची पुष्टी झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे (DC) फ्रँचायझी फिजिओ पॅट्रिक फरहार्ट (Pattrick ferhart) यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यानंतर फ्रँचायझीच्या वैद्यकीय पथकाने त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. या प्रकरणाशी संबंधित उर्वरित माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

यात हे लक्षात घेण्यासारखे आहे की मागील वर्षी देखील अशाच कोविड प्रकरणानंतर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. अशा परिस्थितीत आता आयपीएल २०२२ च्या आयोजनाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या