🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये फलंदाज म्हणून विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक होती. त्याने आपल्या संघासाठी खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये केवळ दोनदा ५० धावांचा टप्पा पार केला आणि तीनदा तो गोल्डन डकवर बाद झाला. विराट कोहली सात डावात वैयक्तिक एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. यंदाच्या हंगामात एकही फलंदाज इतक्या वेळा वैयक्तिक एकेरी धावसंख्येवर बाद झाला नाही. शुक्रवारी झालेल्या क्वालिफायर २ मध्येही कोहलीला फलंदाजीत लय गवसली नाही आणि तो ७ धावांवरच बाद झाला.
आयपीएल २०२२ हंगाम हा विराट कोहलीसाठी २००९ नंतर सर्वात वाईट वर्ष ठरले आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने १६ सामन्यांत २२.७३ च्या सरासरीने फक्त ३४१ धावा केल्या. विराट कोहलीच्या सततच्या खराब फलंदाजीबाबत टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटने विश्रांती घ्यावी, असे सांगितले होते. आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही कोहलीच्या खराब फलंदाजीबद्दल आपलं मत मांडलं आहे.
क्रिकबझशी बोलताना मायकेल वॉन म्हणाला की, कोहली एक महान खेळाडू आहे आणि तो अशा टप्प्यातून जात आहे जो फारसा सोपा नाही. दोन-तीन वर्षांपूर्वी तुम्ही टीव्ही चालू करताच किंवा मैदानावर सामना पाहायला गेला असता, विराट कोहली शतक झळकावणार आहे, हे तुम्हाला कळत असायचे. तो त्या टप्प्यातून गेला जेव्हा प्रत्येक सामन्यात तो शतक झळकावणार असे वाटत होते. हे क्रिकेट आहे आणि तुमचा काळ पूर्वीसारखाच असला पाहिजे असे नाही.
Virat Kohli reacts after RCB failed to make their way into the final of IPL 2022.#ViratKohli #RCB #IPL2022 #Cricket #CricTracker pic.twitter.com/4XOKSUcXCH
— CricTracker (@Cricketracker) May 28, 2022
वॉन म्हणाला की त्याला फक्त विश्रांतीची गरज आहे, त्याने जावे आणि त्याच्या कुटुंबासाठी थोडा वेळ काढावा. त्यानंतर इंग्लंडच्या दौऱ्यासाठी सज्ज होऊन तिथे जाऊन आपल्या फलंदाजीचं कौशल्य दाखवाव. तो पुढे म्हणाला की, कोहलीसाठी हा कठीण काळ आहे आणि त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. मला वाटतं यावेळी त्याने आपली बॅट बॅगमध्ये भरून कुटुंबासोबत वेळ घालवावा. या काळात त्यांने जाहिराती इत्यादी सर्व गोष्टींपासून दूर जावे. काही आठवडे कुटुंबासोबत घालवल्यानंतर जेव्हा तो बॅट उचलेल तेव्हा तो फ्रेश असेल.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
