🕒 1 min read
मुंबई: माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या आई-वडिलांची अर्थातच विलासराव देशमुख यांची लग्नपत्रिका त्याच्या सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. त्याला साजेसं कॅप्शनही त्याने दिले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून त्याला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.
“29 मे 1975 ज्या दिवशी माझ्या आई-वडिलांचे लग्न झाले. महाराष्ट्रात कुठेतरी, कुठल्यातरी गावात आजही कुणाला लग्नाचं आमंत्रण असतं.”, असे ट्वीट करत रितेशने विलासराव आणि वैशाली देशमुख यांची लग्नपत्रिका पोस्ट केली आहे. यातून त्याने वडील विलासराव यांच्यासोबतच्या आठवणी जागृत केल्या आहेत.
https://twitter.com/Riteishd/status/1531137966353297411
दरम्यान इ.स. १९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव १८ ऑक्टोबर, १९९९ ते १६ जानेवारी २००३ व १ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : गुजरातने फक्त ‘या’ ५ खेळाडूंना दिली संपूर्ण हंगामात खेळण्याची संधी; हार्दिक पंड्याही नाही खेळू शकला सगळे सामने
- IPL 2022 Final : नवऱ्याच्या भीमपराक्रमावर बायकोचे आनंदाश्रू..! हार्दिक-नताशाचा ‘भावूक’ VIDEO होतोय व्हायरल; पाहा!
- “हिंदू-मुस्लिमांमध्ये भाजप ध्रुवीकरण घडवण्याचा प्रयत्न करत आहे” ; अशोक चव्हाणांची टीका
- चौंडी ग्रामपंचायतची ८० एकर जमीन रोहित पवारांनी हडपली; राम शिंदेंचा गंभीर आरोप
- IPL 2022 Final GT vs RR : “…तर चमत्कार घडू शकतात”, ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते एकदा वाचाच!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
