🕒 1 min read
मुंबई : अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने चमकदार कामगिरी करत आयपीएल २०२२ (IPL 2022)चे विजेतेपद पटकावले. दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिकने या टी-२० लीगमध्ये पुनरागमन केले. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीकडे लागल्या होत्या. मात्र, हार्दिकने चांगली कामगिरी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. हार्दिक दुखापतग्रस्त झाल्यावर त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने त्याचे मनोबल वाढवले. हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले तेव्हा नताशा खूपच भावूक दिसत होती. नताशा आणि हार्दिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुजरात टायटन्स चॅम्पियन होताच नताशाही मैदानात आली होती. तिने पती हार्दिक पंड्याला मिठी मारली. यावेळी नताशा भावूक दिसली. मात्र, नंतर हार्दिक त्याचे सांत्वन करताना दिसला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला १३० धावांवर रोखले. यानंतर त्यांनी ७ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. यासह हार्दिकने इतिहास रचला. कर्णधारपदाच्या पहिल्या सत्रात आयपीएलचे जेतेपद पटकावण्याच्या बाबतीत हार्दिकने २००८मध्ये राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवणाऱ्या दिवंगत कर्णधार शेन वॉर्नची बरोबरी केली.
https://twitter.com/Ashok94540994/status/1530978490887319552?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1530978490887319552%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-watch-viral-video-natasa-stankovic-gets-emotional-after-meeting-husband-hardik-pandya-post-gt-win-ipl-title-4286714.html
आयपीएल २०२२ हा हार्दिक पंड्यासाठी पुनरागमनाचा हंगाम ठरला आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात गोलंदाजी न केल्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. टी-२० विश्वचषकानंतर तो एकही सामना न खेळता आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आला होता. त्याच्या तंदुरुस्तीबद्दल शंका होत्या. पण या सर्व गोष्टींना मागे टाकत हार्दिकने आयपीएलच्या या हंगामात फलंदाजीसोबतच शानदार गोलंदाजी केली. फायनलमध्ये त्याने तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
