मुंबई : डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग प्रथमच टीम इंडियामध्ये स्थान मिळवल्यानंतर आनंदी आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या चालू हंगामात डेथ ओव्हर्समध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या २३ वर्षीय अर्शदीपने १० विकेट्स घेऊन आपल्या मोहिमेचा शेवट केला, परंतु यादरम्यान त्याने ७.७०च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. अचूक आणि वाइड यॉर्कर गोलंदाजी करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे, त्याला पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी अर्शदीप सिंगला ही आनंदाची बातमी मिळाली. पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादवर पाच विकेट्सने मिळवलेल्या विजयानंतर अर्शदीपने त्याचा सहकारी हरप्रीत ब्रारला सांगितले, ”मला सामन्यापूर्वी बातमी मिळाली की माझी भारतीय संघात निवड झाली आहे. सामना होणार होता त्यामुळे मला फारसे काही वाटले नाही.”
Congratulations to our Kharar boy Arshdeep Singh for securing his place in the Indian cricket team going for T20 series against South Africa. Best wishes to this young lad for more great achievements! pic.twitter.com/ud3IivOyk2
— Sukhbir Singh Badal (@officeofssbadal) May 23, 2022
संघात निवड झाल्याबद्दल अर्शदीप म्हणाला, “भारतीय संघात माझी निवड झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. खरे तर, मला याची माहिती मिळाली. मॅच सुरू असताना मला तितकेसे वाटत नव्हते, पण सकाळी उठल्यावर मला जाणवेल की हा खूप खास क्षण आहे. मी भाग्यवान आणि कृतज्ञ आहे आणि मला अशीच कामगिरी पुढे चालू ठेवायची आहे. पंजाब किंग्जच्या नेट सत्रात जॉनी बेअरस्टो, शिखर धवन आणि लियाम लिव्हिंगस्टोन सारख्या जागतिक दर्जाच्या फलंदाजांना गोलंदाजी केल्याने मला माझे यॉर्कर्स परिपूर्ण करण्यास मदत झाली.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

