Share

“त्यांचा कोणता कोटा आहे तो विचारा” ; नितेश राणेंची संजय राऊंतावर अश्लील शब्दात टीका

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून अधिक तापलं आहे. नितेश राणे यांनी अनेकदा महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीका केली आहे. आज नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरती पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. मात्र नितेश राणे यांनी पहिल्यांदाच राऊतांबाबत अश्लिल भाषेत टिप्पणी केली आहे.

“त्या संजय राऊतला तुम्ही किती महत्त्व देणार, आता सगळ्या जणांनी आम्ही आता ठरवलंय. उगात XXX लोकांना आपण महत्त्व नाही द्यायचं. तुम्ही राज साहेब ठाकरेबाबत बोलण्यापेक्षा, संजय राऊत कधी एकटं आयोध्या सोडा. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये फिरले तर त्यांची काय अवस्था होईल हे समजेल. पुरा दिवस फक्त पवार साहेबांची आणि अन्य लोकांची XXX करून आता परत एकदा खासदार झाले आहेत. पहिलं त्याचा कोटा कुठला हे त्यांना विचारा शिवसेनेच्या कोट्यातले आहेत की, राष्ट्रवादीच्या कोट्यातले” अशा शब्दांमध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावरती टीका केली.

महाविकास आघाडीचं सरकारवर नितेश राणे त्यांच्यावरती सातत्याने टीका करत आहेत. नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून नितेश राणे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती टीका केली आहे. अनेकदा सरकारच्या विरोधात तअधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळात आहे. आता तर त्यांनी अश्लिल भाषेत टिप्पणी केली आहे. “दीघे साहेबांचं त्यांना नाव वापरायचं असेल. त्यांच्या विरोधात यांना काम करायचं असेल. मग त्या चित्रपटाचं तुम्ही प्रमोशन का करताय. जी स्थिती चित्रपटात दाखवली आहे, तशी सध्या परिस्थिती ठाण्यात आहे का ? दीघे साहेबांनी ठाण्यात प्रत्येक ठिकाणी विकास झाला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापणा केली. पण हा विकास दिव्यामध्ये दिसतोय का ? डान्सबार मटका सगळं सुरू आहे” अशी टीकाही नितेश राणेनी यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!