Share

Asia Cup 2022 : उत्कंठा महामुकाबल्याची..! आज भारत-पाकिस्तान आमनेसामने; कोण मारणार बाजी?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गत आशियाई चॅम्पियन भारत आशिया चषक हॉकी चॅम्पियनशिप २०२२ (Asia Cup 2022) मध्ये आज २३ मे रोजी जकार्ता येथील GBK एरिना येथे पाकिस्तान विरुद्ध हाय व्होल्टेज सामना खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना सायंकाळी पाच वाजता सुरू होईल. या चॅम्पियनशिपमध्ये भारताला पाकिस्तान, जपान आणि यजमान इंडोनेशियासह ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. अनुभवी बिरेंदर लाक्रा याच्या नेतृत्वाखाली भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करेल.

त्याचबरोबर या स्पर्धेत पाकिस्तानने काही नवे चेहरे आणले आहेत. पाकिस्तान या स्पर्धेतून भुवनेश्वर येथे होणाऱ्या २०२३ विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न करत आहे. आशिया चषक स्पर्धेतील अव्वल तीन संघ जानेवारीत होणाऱ्या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी प्रत्येकी तीन वेळा आशिया कप जिंकला आहे.

भारताने २०१७मध्ये शेवटचा हंगाम जिंकला होता आणि ढाका येथे झालेल्या अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव केला होता. भारताचा माजी कर्णधार सरदार सिंग २० सदस्यीय संघाचा प्रशिक्षक आहे. या संघाचे नेतृत्व रुपिंदर पाल सिंग करत होता, परंतु सराव सत्रादरम्यान मनगटाच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. त्याच्या जागी कर्णधार लाक्रा आणि उपकर्णधार एसव्ही सुनील यांची निवड करण्यात आली. त्याच वेळी, संघात १० खेळाडू आहेत, जे वरिष्ठ भारतीय संघात पदार्पण करणार आहेत.

पाकिस्ताननंतर, मंगळवारी ‘अ’ गटात भारताचा सामना जपानशी होईल आणि त्यानंतर २६ मे रोजी संघ यजमान इंडोनेशियाशी भिडणार आहे. मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांगलादेश हे गट ‘ब’मध्ये आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!