Share

IPL 2022 : गब्बरनं गाठलं ‘चौकारांचं’ शिखर..! आयपीएलमध्ये केली कोणालाही न जमलेली कामगिरी; वाचा धवनचा विक्रम!

Published On: 

मुंबई : पंजाब किंग्जने आयपीएल २०२२ (IPL 2022)ची विजयासह समाप्ती केली. अखेरच्या साखळी सामन्यात पंजाब संघाने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यादरम्यान पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवनने नवा विक्रम प्रस्थापित केला, तो स्पर्धेच्या इतिहासात ७०० चौकार ठोकणारा पहिला खेळाडू ठरला.

डावखुरा फलंदाज शिखर धवनने आयपीएल २०२२च्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यात पहिला चौकार खेचत हा विक्रम आपल्या नावावर केला. या लीगमध्ये आतापर्यंत एकाही फलंदाजाने ६०० चौकार मारले नसून धवनच्या चौकारांची संख्या ७००च्या पुढे गेली आहे. ही एक फलंदाजासाठी मोठी गोष्ट आहे.

धवनने आतापर्यंत २०६ आयपीएल सामन्यांच्या २०५ डावांमध्ये ६२४४ धावा केल्या आहेत, त्यापैकी २८०४ धावा केवळ चौकारांच्या मदतीने केल्या आहेत. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ७०१ चौकार मारले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहलीचे नाव आहे, त्याने आतापर्यंत ५७६ चौकार मारले आहेत. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये ५६१ चौकार मारले आहेत. रोहित शर्माच्या बॅटमधून ५१९ चौकार लागले आहेत, तर सुरेश रैनाने ५०६ चौकार मारले आहेत.

असा रंगला सामना..

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सामन्यात पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादला (SRH vs PBKS) ५ गड्यांनी सहज धूळ चारत शेवट गोड केला. वानखेडे स्टेडियमवर रंगेलल्या या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात हैदराबादने पंजाबला १५८ धावांचे आव्हान दिले. केन विल्यमसन घरी परतल्यामुळे भुवनेश्वर कुमारकडे हैदराबाद संघाची धुरा सोपवण्यात आली होती. त्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रत्युत्तरात लियाम लिव्हिंगस्टोनच्या वादळी ४९ धावांच्या जोरावर पंजाबने १५.१ षटकातच हा सामना खिशात घातला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!