Share

राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहणे अवमान; पण गुन्हा नाही

Published On: 

श्रीनगर : राष्ट्रगीतासाठी उभे न राहणे त्याचा अवमान ठरू शकतो. ते राष्ट्रीय चिन्हांच्या अवमान रोखण्याच्या अधिनियमांतर्गत गुन्हा होऊ शकत नसल्याचे जम्मू आणि काश्मीर हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्या पीठाने महाविद्यालयाचे व्याख्याते डॉ. तौसिफ अहमद भटविरोधातील राष्ट्रगीताच्या अवमानप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करत ही टिप्पणी केली.

बाणी येथील सरकारी पदवी महाविद्यालयातील एक अध्यापक डॉ. तौसिफ अहमद भट यांच्या विरोधात ‘राष्ट्रीय सन्मानचिन्हंचा अपमान प्रतिबंधक कायद्यान्वये तीन वर्षांपूर्वी नोंदलेला गुन्हा रद्द करताना न्या. संजीव कुमार यांनी हा निकाल दिला. या कायद्याच्या कलम ३ चे विश्लेषण करून त्यांनी म्हटले की, राष्ट्रगीताला सन्मान न देणे हा गुन्हा नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीने राष्ट्रगीत सुरु असताना गोंधळ घातला किंवा ते बंद पाडले तर तो या कायद्यानुसार गुन्हा ठरतो.

न्यायालयाने सांगितले की, एखाद्या व्यक्तीने राष्ट्रगीत थांबवण्याचा किंवा सभेत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा होऊ शकतो. तेव्हा असे करणे संबंधित अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत दंडास पात्र आहे. यात तीन वर्षांपर्यंतची कैद वा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.

काय होते प्रकरण?
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा जल्लोष करण्यासाठी गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज, बानी (कठुआ जिल्हा) येथे २९ सप्टेंबर २०१८ रोजी एक समारंभ झाला होता. त्यात राष्ट्रगीतावेळी डॉ. भट उभे राहिले नव्हते. याआधारे त्यांच्यावर राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप झाला होता.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!