Share

‘मोदी सरकारला गोडसेचा काश्मीर बनवायचा आहे’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: काश्मीरचा मुद्दा चर्चेचा विषय असतो. हा मुद्दा अनेकवेळा निवडणुकांसाठी प्रचाराचा विषय सुद्धा ठरतो. अशा या काश्मीरच्या मुद्द्यावरून मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने काश्मीरचं मोठं नुकसान केल्याचा आरोप मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. या सरकारमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचंही महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारने कलम ३७० हटवून काश्मीरचं मोठं नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे, आणि मोदी सरकार नवे काश्मीर बनवल्याचा दावा करत आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. याच सोबत मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांचं कौतुक देखील केलं आहे. वाजपेयींनी काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम केले, मात्र मोदी सरकारने नुकसान केले असल्याचा आरोप महबूबा मुफ्ती यांनी केला आहे.

मोदी सरकारला जम्मू-काश्मीर गोडसेचं जम्मू-काश्मीर बनवायचं आहे. भाजप सरकारने भारत गांधींचा ठेवला नाही, हा नवा भारत गोडसेंचा भारत बनवला आहे, असा घणागात देखील मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. इथल्या लोकांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे. शेत-जमिनी जाण्याची त्याच सोबत नोकऱ्या जाण्याची देखील भीती इथल्या नागरिकांना वाटत असल्याचे मुफ्ती यांनी सांगितल आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!