🕒 1 min read
मुंबई : सध्या प्रचंड चर्चेत असलेला चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ अनेक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतोय. सर्वच क्षेत्रांतील प्रेक्षकांनी ह्या चित्रपटाला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे, राजकीय क्षेत्र हेही या चित्रपटासाठी काही अपवाद नाही.
जम्मू काश्मीर मध्ये मुस्लिम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात कर मुक्त करावा अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
‘जम्मू काश्मीर मधील हिंदू समाजावर मुस्लिम दहशतवाद्यानी अनन्वित अत्याचार केले याचं योग्य आणि खरं चित्रीकरण एका चित्रपटाच्या माध्यमातून या देशातील जनतेसमोर येत आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी भूमिका घेणारे मुख्यमंत्री हा चित्रपट अनेक लोकांनी पहावा याकरिता नक्कीच प्रोत्साहन देतील असा विश्वास आहे’ असेही आ. भातखळकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
