पुणे : “राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्ववादाची भूमिका आता बदलू नये. वसंत मोरे, साईनाथ बाबर यांच्यापेक्षाही हिंदुत्व महत्वाचे आहे.” असे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हंटले आहे.
राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीच्या भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेनंतर ब्राह्मण महासंघाने राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केले होते. पण त्याचबरोबर एक भिती व्यक्त केली होती की, राज ठाकरे हे आता घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी फारकत घेतील. किंवा अप्रत्यक्षपणे मागे घेतील.राज ठाकरेंना विनंती आहे की, त्यांनी घेतलेल्या भोंग्यांचा मुद्दा अखेरपर्यंत लावून धरावा. ब्राह्मण महासंघ राज ठाकरेंकडे मोठ्या आशेने बघत आहे.
दरम्यान मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर हे राज ठाकरे यांना भेटून आपल्या भावना व्यक्त करणार असे म्हणाले होते. येत्या ९ एप्रिल रोजी राज ठाकरे यांची सभा आहे. या सभेला उत्तरसभा असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :


