मुंबई : एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत असतांना काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी स्वातंत्र्य, संस्थात्मक स्वातंत्र्य आणि भारताच्या कल्पनेसंदर्भात भाष्य केले. तसेच भारताचा राष्ट्रवाद धर्मावर नव्हे तर संविधानावर आधारित असल्याचेही थरूर यावेळी म्हणाले.
यावेळी बोलत असतांना शशी थरूर म्हणाले की,‘पाकिस्तान इस्लामवर विश्वास ठेवतो आणि भारतात राष्ट्रवाद संविधान आणि संस्थात्मकतेवर आधारित आहे. हा आपला राष्ट्रवाद असून जेव्हा आपण कायद्यासंदर्भात बोलतो तेव्हा तो आपल्या राष्ट्रवादाचा आधार असतो.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘आपल्या देशात प्रत्येकाला समान अधिकार आहेत. तसेच देशातील प्रत्येकजण राजकारणासंदर्भात बोलू शकतो आणि संविधानाच्या माध्यमातून कायदा प्रत्येकाला सहमत आणि असहमत होण्याचा अधिकार असल्याची हमी देतो’, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो ईश्वर”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला
- “महाराष्ट्राच्या मंत्रालयात लता दीदींची गाणी कानावर पडली पाहिजे”, राज ठाकरेंची मागणी
- “…त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार”, अजित पवारांनी सांगितले कारण
- “आमदारांना मोफत घरं मिळणार…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य
- दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी दाखवला प्रतिकात्मक हातोडा; म्हणाले, “…यांना बाहेर घालवणार”


