Share

निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर जुमला ??, चीनच्या ५४ अॅपवर भारत सरकारची बंदी

Published On: 

नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन मोठ्या आशिया खंडातील देशात सतत राजकीय कुरघोडी चाहलू असतात. २०१७ मध्ये डोकलाम वादानंतर, २०२० च्या जून महिन्यात भारतीय आणि चीनचे लष्कर यांच्यात ”गलवान खोर” येथे लष्करी झटापट झाली. या झटापटीत दोन्ही बाजूचे अनेक सैनिकी अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. भारत आणि चीन सरकारमध्ये मध्यंतरी अनेक चर्चा पण झाल्या. परंतु दोन देशातील वाद काही शमताना दिसत नाहीये.

आजच भारत सरकरने चीनमध्ये उत्पादित झालेल्या ५४ अॅपवर बंदी घातली आहे. भारत देशाच्या सुरक्षितेच्या कारणावरून आम्ही चीनमधील एकूण ५४ अॅपवर बंदी घालत आहोत अशी घोषणा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. याबाबतची अधिक माहिती देताना मंत्री म्हणाले कि, ” बंदी घातलेली ५४ अॅप ही भारतीय लोकांची संवेदनशील माहिती अवैधरित्या गोळा करत होते आणि त्यामुळे देशाला व देशातील नागरिकांना यामुळे धोका संभवत होता.

आज बंदी घातलेल्या ५४ अॅपमध्ये स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा सेल्फी कॅमेरा, व्हिवा व्हिडिओ एडिटर आणि ड्युअल स्पेस लाईट अश्या लोकप्रिय अॅपवर बंदी घातली आहे. २०२१ मधील जून महिन्यात भारत सरकारने टिकटॉक, वी चॅट आणि हॅलो अश्या लोकप्रिय अॅपवर बंदी घातली होती. भारतीय तंत्रद्यान कायदा ६९ (अ) मधील तरतुदींनुसार आम्ही चीनमधील अॅपवर बंदी घालत आहोत अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आज दिली.  भारत सरकारने मे २०२० पासून आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!