Share

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

Published On: 

पुणे : पुणे शहर हे महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे शहर आहे. पुणे शहर हे राज्यातील सर्वात मोठे शहर असले तरी पुणे शहरात सार्वजनिक वाहतुकीची सोय देशातील इतर मोठ्या शहरांसारखी प्रगत नाही. मात्र गेल्या काही वर्षात पुणे शहरात मेट्रोच्या कामाने वेग पकडला आहे. पुणे शहरात मेट्रोच्या  एकूण ३ मार्गिका असणार आहेत. पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट, वनाझ ते रामवाडी, हिंजेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय अश्या पुणे मेट्रोच्या तीन मार्गिका असणार आहेत.

या पुणे मेट्रोसाठी आजवर असंख्य कामगार दिवसभर राबत आहेत. याच कामगारांच्या मेहनतीची परतफेड म्हणून आणि विश्वकर्मा जयंतीच्या पूर्वसंध्येला पुण्यातील ज्या श्रमसाधकांनी मेट्रो उभी केली त्यांचे आभार व्यक्त करून सन्मान करण्यात आला. जे असंख्य कामगार पुणे मेट्रोसाठी दिवसरात्र काम करीत आहेत त्यांचा आज सत्कार करून भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत पुष्पाभिषेक करण्यात आला. हा सत्कार कार्यक्रम पुणे शहरातील गरवारे महाविद्यालय मेट्रो स्टेशनच्या येथे करण्यात आला. पुणे मेट्रोसाठी कोरोना काळात पण मेहनत घेऊन पुणे मेट्रोचे मूर्त रूप साकारल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत गरवारे महाविद्यालय मेट्रो स्टेशन येथे पुष्पाभिषेक करण्यात आला. यावेळी पुणे मेट्रोसाठी जे अभियंते काम करत आहेत त्यांना शिवाजी महाराज यांच्याकाळातील बांधकाम कौशल्ये असणारे हिरोजी इंदुलकर यांच्या नावाची वीट देखील देण्यात आली.

यावेळी पुणे मेट्रोचे अतुल गाडगीळ, भाजपच्या नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, दीपक पोटे, मंजुश्री खर्डेकर आणि गिरीश खत्री उपस्थित होते. गिरीश खत्री आणि मित्रपरिवाराच्या वतीने पुणे मेट्रोच्या श्रमसाधकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!