Share

बुलडाण्यात वाईन विक्री विरोधात भाजपच्या महिला आक्रमक

Published On: 

बुलडाणा: राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या विरोधात राज्यभरात भाजप आक्रमक (BJP Against Wine Sale) झाले आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी ठिकठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाण्यात देखील भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने कडाडून निदर्शने करण्यात आली आहेत.

राज्यसरकारने किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीचा जो निर्णय घेतला आहे तो निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा. वाईन विक्री किराणा दुकानात सुरू झाली तर महाराष्ट्रातील कुटुंबावर संकट येईल, संसार उद्ध्वस्त होतील. या निर्णयामुळे तरुणवर्ग व्यसनाधीन होतील म्हणून हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्या महिला मोर्चाच्या वतीने कडाडून विरोध करत निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.

किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी देऊ नये यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच राज्यातील भाजप नेत्यांकडून देखील याला तीव्र विरोध होत आहे. यावर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून मात्र वाईन विक्रीला पाठिंबा असल्याचेच धोरण कायम आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!