आगरतळा : देशात सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात गोवा, पंजाब,उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या पाच राज्यात सर्वच प्रमुख पक्षांच्या प्रचाराने चांगलाच वेग पकडला आहे. प्रत्येक पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत, मात्र ही राजकीय टीका करताना अनेक नेत्यांचा तोल ढसाळताना दिसत आहे.
असाच काहीसा प्रकार आज त्रिपुरा राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घडला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय कुमार यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नितीन गडकरींवर टीका केली; मात्र ही टीका करताना त्यांची जीभ घसरल्याचे दिसून आले. काँगेसचे नेते अजय कुमार नितीन गडकरींवर टीका करताना म्हणाले कि, ” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जेव्हा आरआरएसची खाकी हाल्फ पॅन्ट घालायचे तेव्हा ते फार ओंगळवाणे दिसायचे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वयस्क आणि जाड नेते जेव्हा हाफ पँट घालतात तेव्हा ते विचित्र दिसतं. खाकी पॅन्टमधील त्यांचा जुना फोटो बघितल्यास ते फार विचित्र आणि ओंगळवाणं दिसत असेही ते आज राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि नितीन गडकरींवर टीका करताना म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी हाल्फ पॅन्ट घातल्यावर फार अश्लील दिसत ते असेही ते आज म्हणाले. अजय कुमार आज त्रिपुरा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते तेव्हा त्यांनी आरआरएसची पॅन्ट घातल्यावर फार अश्लील दिसत अशी टीका केली.
महत्वाच्या बातम्या :
- राज ठाकरेंचा ‘हिंदुहृदयसम्राट’ उल्लेख; मुंबईत मनसेची बॅनरबाजी
- “वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका”; एकनाथ खडसेंची टीका
- जळगावातील वाघूर धरणावर पक्षांची मांदीयाळी; रेषाळ बगळा, तपकिरी खाटीकचे दर्शन
- चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
- IPL AUCTION 2022: यंदा लखनऊच्या रूपाने सुपरजायंट्सचा स्पर्धेत पर्दापण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

