मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) एक महत्त्वाचा आणि अनुभवी फलंदाज मानला जातो. मागील काही काळापासून पुजारा फॉर्ममध्ये नव्हता, त्यामुळे तो टीम इंडियातून (team india) बाहेर गेला. शिवाय आयपीएल २०२२ (IPL 2022) मेगा ऑक्शनमध्येही त्याला कोणी वाली मिळाला नाही. आता त्याने इंग्लंडमध्ये जाऊन शतक ठोकले आहे.
काऊंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन दोनमधील एका सामन्यात ससेक्सकडून खेळताना त्याने शानदार शतक झळकावले. काऊंटी हंगामातील हा त्याचा पहिला सामना आहे. त्याची ही खेळीही महत्त्वाची आहे कारण भारतीय संघाला जुलैमध्ये इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळायचा आहे. तिथेही पुजाराने आपली कामगिरी कायम ठेवली तर तो पुन्हा एकदा संघात पुनरागमन करू शकतो.
Cheteshwar Pujara on his way to a century on Sussex debut ????#CountyCricket pic.twitter.com/4nyQURgmW1
— Wisden India (@WisdenIndia) April 17, 2022
चेतेश्वर पुजाराच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीतील हे ५१वे शतक आहे. या सामन्यापूर्वी त्याने २२६ सामन्यांच्या ३७४ डावांमध्ये ५१च्या सरासरीने १६९४८ धावा केल्या होत्या. म्हणजेच अशाप्रकारे त्याच्या १७ हजार धावाही पूर्ण झाल्या आहेत. त्याने भारतासाठी ९५ सामन्यात ४४ च्या सरासरीने ६७१३ धावा केल्या आहेत. त्याने १८ शतके आणि ३२ अर्धशतके केली आहेत. म्हणजेच ५० वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने नाबाद २०६ धावांची सर्वात मोठी खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

