Share

IPL 2022 : २०वं षटक अन् तेही निर्धाव…! उमरान मलिकशिवाय ‘या’ गोलंदाजांनी केलाय हा पराक्रम; नक्की वाचा!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (umran malik) याने आज रविवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी करत ४ बळी घेतले. विशेष म्हणजे त्याने डावातील २०वे षटक निर्धाव टाकले, या षटकात ४ विकेटही पडल्या. या सामन्यात त्याने भन्नाट वेगाने गोलंदाजी करत सर्वांची वाहवा मिळवली.

जम्मू-काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना शेवटच्या षटकात पंजाब किंग्जच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि अर्शदीप सिंग धावबाद झाला. या षटकात एकही धाव आली नाही. अशाप्रकारे मलिकने आपल्या कोट्यातील ४ षटकात २८ धावा दिल्या आणि ४ बळी घेतले.

उमरान मलिकच्या आधी दोन भारतीय गोलंदाजांनीही आयपीएलमध्ये २०वे षटक निर्धाव फेकले आहेत. विशेष बाब म्हणजे यापैकी एकाने २००७ मध्ये भारताला टी-२० विश्वचषकही मिळवून दिला होता, ज्याचे नाव आहे इरफान पठाण. पंजाब किंग्जकडून खेळताना त्याने २००८मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध मोहालीत ही कामगिरी केली होती.

एका वर्षानंतर, म्हणजे २००९मध्ये, लसिथ मलिंगाने २०वे षटकही निर्धाव टाकले. त्यानंतर २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने २०वे षटक निर्धाव टाकले. आज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाने १५१ धावा केल्या. अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक ६० धावांचे योगदान दिले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!