Share

IPL 2022 CSK vs GT : हार्दिक पंड्या संघाबाहेर..! गुजरातच्या ‘नव्या’ कॅप्टननं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!

Published On: 

मुंबई: आयपीएल २०२२ चा २९ वा सामना आज पुण्यातील MCA स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. नाणेफेक जिंकत गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे कर्णधार हार्दिक या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी सूत्रे आज रशिद खानच्या हाती आहेत.

गुजरात टायटन्सने (GT) पहिले तीन सामने जिंकल्यानंतर SRH विरुद्धचा पहिला सामना गमावला होता. चेन्नई सुपर किंग्ज स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे. तर दुसरीकडे पहिलाच हंगाम खेळणारे गुजरात टायटन्सही प्रतिभावान खेळाडूंनी भरलेले आहे. ज्यामुळे आजच्या लढतीत मोठी चुरस दिसून येईल. दोन्ही संघात मोठे फटके मारणारे स्टार खेळाडू आहेत. ज्यामुळे आज एमसीएवर अनेक चेंडू सीमापार होताना दिसतील. हार्दिकच्या जागी आज आयपीएलआधी विवादात असलेला रिद्धिमान साहा खेळणार आहे.

दोन्ही संघ:
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रॉबिन उथप्पा, रुतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (C), एमएस धोनी (WK), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महेश थेक्षाना, मुकेश चौधरी

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (wk), शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान (C), अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!