मुंबई: १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पश्मिच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पदासाठी इच्छूक नसल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून पवार नाहीत, मग कोण? असा सवाल केला आहे.
विरोधक जर राष्ट्रपतीपदासाठी सर्वसहमतीचा ‘कडक’ उमेदवार उभा करू शकत नाहीत तर ते देशाला सक्षम पंतप्रधान कसा देणार? असा प्रश्न जनतेच्या मनात येऊ शकतो. उद्या विरोधी पक्षांचे आकडे जमलेच तर पंतप्रधानपदासाठी अनेक नवरदेव रांगेत उभे राहतील, पण राष्ट्रपतीपद नको रे बाबा! तरीही ममता बॅनर्जी म्हणतात त्याप्रमाणे राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही 2024 ची तयारी आहे. विरोधकांना ती गांभीर्याने घ्यावीच लागेल. सरकार पक्षाकडून कोणीही उभे राहो, विरोधकांना गांभीर्यपूर्वक लढावे लागेल. पवार नाहीत, मग कोण? या प्रश्नाचे उत्तर सहा महिन्यांपूर्वीच शोधले असते तर गांभीर्य झळाळून निघाले असते. आता उशीर झाला आहे. तरीही वेळ निघून गेलेली नाही. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थान नामक महाकाय देशाचे पुढील राष्ट्रपती कोण होणार यावर आता दोन्ही बाजूंनी खल सुरू झाला आहे. अमेरिका, फ्रान्स, दक्षिण आफ्रिकेसारख्या राष्ट्रांत राष्ट्राध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया साधारण दीड दोन वर्षे आधी शुरू होते व त्या प्रक्रियेत एक गांभीर्य असते. आपल्या देशात असे गांभीर्य आज कुठे दिसते आहे काय? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 18 जुलै रोजी देशाचे नवे राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान होईल. देशातील विरोधी पक्षाची बैठक दिल्लीत बुधवारी पार पडली व राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण यावर पहिली चर्चा झाली. शरद पवार हे राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत असे स्वतः त्यांनीच जाहीर केल्यामुळे विरोधकांच्या आघाडीच्या फुग्याची हवाच गेली.
शरद पवार नाहीत तर दुसरे कोण? तोलामोलाचा कोणी नेता विरोधी आघाडीचा उमेदवार होऊ शकेल काय? या प्रश्नांची उत्तरे अधांतरी सोडून ममता बॅनर्जी यांनी निमंत्रित केलेली बैठक संपली, महात्मा गांधीचे नातू गोपालकृष्ण गांधी, डॉ. फारुख अब्दुल्ला या नेहमीच्याच नावावर चर्चा झाली, पण ही नावे म्हणजे विरोधी आघाडीची बलस्थाने नाहीत. या दोन्ही नावांमुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण होईल असे त्यांचे व्यक्तिमत्व नाही. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- फडणवीसांनी शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला भातखळकरांनी म्हटले, “नागपुरी मिरची म्हणजे…”
- “आधी माझी उधारी द्या…” ; हॉटेलचालकाने सदाभाऊ खोतांना अडवलं!
- VIDEO : जुनी सवय मोडायची नाय..! रोहित शर्मा मुंबईच्या गल्लीत खेळतोय क्रिकेट; ठोकला उंच षटकार!
- चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ वर्तवणुकीमुळे मलायका अरोरा झाली ट्रोल ; पाहा VIDEO
- “शरद पवार राष्ट्रपती झाल्यास देशात दहशतवाद वाढेल” ; भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान!


