🕒 1 min read
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक सामना ऑक्टोबरमध्ये होणार आहे. या सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली होती. यावरून अंदाज लावता येईल की चाहते दोन्ही देशांमधील सामन्याची किती आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र दोन्ही देशांमधील वादामुळे २०१२-१३ पासून द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकत्र खेळताना दिसले तर चाहत्यांच्या आनंदाला थारा राहणार नाही. विराट कोहली आणि बाबर आझम एकाच संघाचा भाग असण्याबाबत मोठे नियोजन केले जात आहे.
फोर्ब्सच्या बातमीनुसार, पुढील महिन्यात आयसीसीची बैठक होणार आहे. यात आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह, आफ्रिकन क्रिकेट संघटनेचे नवे अध्यक्ष सुमोद दामोदर, एसीसी विकास समितीचे अध्यक्ष महिंदा वल्लीपुरम जे आयसीसी बोर्डाचे सहयोगी सदस्य संचालक आहेत ते देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) कमर्शियल आणि इव्हेंट्सचे प्रमुख प्रभाकरन थनराज म्हणाले की, “भारत असो की पाकिस्तान असो, आफ्रो आशिया चषक स्पर्धेसाठी कोणतेही क्रिकेट मंडळ प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता कमी आहे.”
According to several media reports, players from India and Pakistan are likely to feature in a series b/w Africa XI and Asia XI, likely to be scheduled in mid-2023. Babar Azam, Shaheen Afridi, Mohammad Rizwan, Rohit Sharma and Virat Kohli could be playing for the same team.
— Farid Khan (@_FaridKhan) June 17, 2022
ते म्हणाले पुढे म्हणाले की, “आम्हाला अद्याप दोन्ही क्रिकेट मंडळांकडून संमती मिळालेली नाही. मात्र आम्ही नियोजन करण्यात व्यस्त असून ते दोन्ही मंडळांसमोर ठेवण्यात येणार आहे. आशियाई इलेव्हनमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश करण्याची आमची योजना आहे. योजना अंतिम झाल्यानंतर आम्ही प्रायोजकत्व आणि प्रसारकांसाठी बाजारात प्रवेश करू. हा कार्यक्रम मोठा असणार आहे. खरोखर प्रचंड मोठ्या स्वरूपाचा असेल.”
वाद मिटविण्यासाठी प्रयत्न
सर्व काही सुरळीत राहिल्यास या कार्यक्रमामुळे भारत आणि पाकिस्तान बोर्डामधील वाद मिटण्यास मदत होईल. सुमोद दामोदर म्हणाले की, ‘दोघांमध्ये सामंजस्य करण्याची संधी मिळाल्याने आम्ही आनंदी आहोत. दोन्ही देशांच्या खेळाडूंना एकत्र खेळताना बघायचे आहे. यापूर्वी २००० च्या मध्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी तर भारताचा वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड एशिया इलेव्हनकडून एकत्र खेळताना दिसले होते.
राजकारणापासून दूर राहणे आवश्यक
दामोदर म्हणाले की, “मला खात्री आहे की खेळाडूंमध्ये असे घडावे आणि राजकारण यापासून दूर ठेवले पाहिजे. पाकिस्तान आणि भारताच्या खेळाडूंना एकाच संघात खेळताना पाहणे खूप छान होईल. हा वार्षिक कार्यक्रम बनवण्याची योजना आहे आणि त्यात सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश आहे. सुमोद दामोदर म्हणाले की, आफ्रो-आशिया चषक हे प्रिमियम उत्पादन आहे आणि त्यातून अधिक उत्पन्न मिळू शकते. विविध मंडळांनाही याचा फायदा होणार आहे. आता या योजनेला बीसीसीआय आणि पाकिस्तान बोर्डाकडून किती पाठिंबा मिळतो हे पाहावे लागेल.”
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
