Share

“सरड्यालाही लाज वाटेल…” ; रोहित पवार आणि अदानी यांच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

Published On: 

मुंबई : शरद पवार यांच्या बारामतीला प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट दिली.  गुरुवारी गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकीकडे  शरद पवार आणि गौतम अदानी एकाच व्यासपीठावर दिसून आले. तर दुसरीकडे रोहित पवार हे अदानी यांच्या स्वागतासाठी स्वत: बारामती विमानतळावर गेले होते. यावेळी रोहित पवार यांनी  स्वत: अदानींची गाडी चालवत त्यांना विज्ञान केंद्रापर्यंत आणले. शरद पवार आणि अदानी एकत्र आल्याची चर्चा चांगलीच रंगली असताना, अशातच दुसरीकडे सोशल मीडियावर वेगळंच चित्र पहायला मिळत आहे.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1701668800189002&id=100010376956604

अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय समजले जात असल्याने पवार कुटुंबियांनी गौतम अदानी यांचं केलेलं आदरातिथ्य यावरून नेटकऱ्यांकडून चांगलच ट्रोल केले जात आहे . एका युझरनं लिहिलंय की, “एकीकडे अदानी-अंबानींच्या नावाने मोदींवर ताशेरे ओढायचं आणि दुसरीकडे त्याच लोकांसोबत फिरायचं. सरड्यालाही लाज वाटेल, असं एका युझरनं रोहित पवार आणि अदानी यांचा फोटो टाकून कॅप्शन दिलं आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेत असून वेगवेगळ्या कमेंट्स देखील या पोस्ट वर करण्यात आल्या आहेत.

तसेच “अदानीला हे विकले, अदानीला ते विकले, अदानींच्या नावाने जयघोषणा केल्यानं अदानींचा बारामतीमध्ये रोहित पवार यांना साक्षात्कार,अदानी विकत घेण्यासाठीच येतात, तर बारामतीमध्ये पवार आता काय विकणार?” असा सवालही एका युझरने केला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!