Share

IND vs SA : आजच्या सामन्यात खेळायला उतरताच ऋषभ पंतच्या नावावर होणार ‘ही’ खास कामगिरी

Published On: 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ आयपीएलनंतर गुरुवारपासून पहिली टी-२० मालिका खेळायला सुरुवात करणार आहे. या मालिकेच्या एक दिवस आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधारपदी निवड झालेल्या केएल राहुलला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले. कर्णधार केएल राहुल आणि फिरकीपटू कुलदीप यादव दुखापतीमुळे या मालिकेचा भाग नसल्याची माहिती बीसीसीआयने बुधवारी संध्याकाळी दिली. त्यामुळे आता भारतीय संघाच्या कर्णधारपदी युवा खेळाडू ऋषभ पंतची निवड करण्यात आली आहे. तर संघाचे उपकर्णधारपद हार्दिक पंड्या कडे सोपवले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. संघाला आपला पहिला सामना गुरुवार ९ जून ला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळायचा आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी संघाचा कर्णधार बनवण्यात आलेल्या राहुलला दुखापत झाली. या मालिकेत उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे देण्यात आली होती. सध्याच्या मालिकेसाठी निवड समितीने या युवा यष्टीरक्षकाकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे.

२४ वर्षीय पंत कर्णधार असेल

युवा ऋषभ पंतला भारतीय संघाच्या कर्णधारपदाची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी त्याने आयपीएलमध्ये फ्रेंचायझी संघ दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आहे. त्याला टी-२० सामन्यांमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी संघात पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पंड्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. आयपीएलच्या नुकत्याच झालेल्या सीझनमध्ये गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवणाऱ्या या खेळाडूने संघाला ट्रॉफी दिली आहे.

सर्वात तरुण भारतीय कर्णधार

ऋषभ पंत हा टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा दुसरा सर्वात तरुण कर्णधार ठरणार आहे. यापूर्वी सुरेश रैनाने वयाच्या २३ वर्षे १९७ दिवसांत भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व केले होते. पंतचे वय २४ वर्षे २४९ दिवस आहे. महेंद्रसिंग धोनीला टी-२० संघाचे कर्णधारपद मिळाले तेव्हा त्याचे वय २६ वर्षे ६८ दिवस होते. त्याच वेळी, अजिंक्य रहाणेने २८ वर्षे ४१ दिवसांत भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व केलेले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!