Share

देशभरातून विरोध होऊनही ‘या’ मुलीने केले स्वतःशीच लग्न

Published On: 

🕒 1 min read

गुजरात : लग्नाविषयी सर्वांचे वेगवेगळे विचार असतात. लग्नासंबंधी सगळ्यांच्याच  विशिष्ट इच्छा आकांक्षा असतात. स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन देशभरात चर्चेत असलेल्या क्षमा बिंदूने अखेर बुधवारी स्वतःशीच लग्न केले. ती ११ जूनला लग्न करणार होती पण तिला या लग्नासाठी देशभरातून प्रचंड विरोध होऊ लागला. यामुळे तिने ठरलेल्या तारखेच्या आधीच ३ दिवस लग्न केले.

भारतात अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याची माहिती समोर येत आहे. क्षमाने ११ जूनला लग्न करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे तिच्या घरी अनेक लोक येऊ लागले. स्वतःशी लग्न करण्याचा निर्णयाला क्षमाच्या शेजाऱ्यांनी देखील विरोध केला. यामुळे तिच्या लग्नाच्य दिवशी घरी कोणी येऊन वाद निर्माण करेल म्हणून, तिने ठरलेल्या तारखेच्या तीन दिवस आधीच लग्न केले.

का घेतला असेल स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय?

एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, “मला कधीच लग्न करायचे नव्हते पण मला वधु बनायचे स्वप्न होते. त्यामुळे मी स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला”. दरम्यान क्षमाने ऑनलाईन पाहिले कोणत्या महिलेने स्वतःशी लग्न केले आहे का? पण तिला कोणीही सापडले नाही. स्वतःशीच लग्न करणारी देशातील ती पहिली महिला असू शकते.

ती एका खासगी कंपनी मध्ये काम करते. “स्वतःशीच लग्न करणे ही स्वतःशी असलेली बांधिलकी आहे”. असे देखील ती म्हणाली. “लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करतात मी स्वतःवरच प्रेम करते म्हणून स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता लग्नानंतर हनिमूनला ती गोव्याला देजाणार आहे”.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!